STORYMIRROR

Vaishali Belsare

Abstract Others

4  

Vaishali Belsare

Abstract Others

पाऊस पहिला

पाऊस पहिला

1 min
481


चिंब मनाचा गाभारा

चिंब हळव्या मनाला

आपसुक येतो कधी

दाटे पाऊस पहिला


आसुसली वेडी धरा

अंकुराच्या सृजनाला

उष्मा किती आत दाटे

यावा पाऊस पहिला


वाटा अशा नटलेल्या

साज आगळा सजला

ओथंबून माळलेला

सखा पाऊस पहिला


राधा चिंब पावसात

साद घालते कृष्णाला

प्रेमवेडी झेलते हा

देही पाऊस पहिला


पर्ण सारीच नाचती

निसर्ग हा आनंदला

गर्द झाल्या वनराई

येता पाऊस पहिला



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract