पाऊस माझा
पाऊस माझा
तुज्यापेक्षा मला पाऊसच बरा वाटतो
तो मला हवा तेव्हा येतो
हवा नसला तरी येतो
नको असला तरी मला आपलस करून घेतो
तू असलीस की आभाळातन कोसळतो
तु नसलीस की डोळ्यातून
सदैव निरंतर माझ्या सोबत असतो
तुझ्यापेक्षा मला पाऊसच बरा वाटतो
कधी कसाही आला तरी मन हलकं करतो
विरहाने होरपळलेल्या अबोल मनाला स्पर्शने आनंदी करतो
मळभ मनाची दूर करून
आसमंती विहार करायला लावणारा हा मित्र खरा वाटतो
तुझ्यापेक्षा मला पाऊसच जास्त बरा वाटतो

