STORYMIRROR

savita Dhakne

Drama

3  

savita Dhakne

Drama

पाऊस आणि मी

पाऊस आणि मी

1 min
14.9K


आल्या आल्या पावसाच्या सरी,

भिजण्याची मजला हौस भारी,

टप टप पावसाची कानी ऐकू येई,

मन माझे लगेच अंगणी धाव घेई.


सुटलाय आता सोसाट्याचा वारा,

गगनी सुरू ढगांच्या येरझारा,

मेघ लागले नभी जोरात गडगडू,

काळीज माझे लागले धडधडू.


झाला सुरू आता गारांचा पाऊस,

गारा गोळा करण्याची भारी हौस,

लागलो सगळे गारा वेचायला,

सवंगड्यासह आनदाने नाचायला.


हिमकणाचा सडा पडलाय अंगणी

हर्ष मावेना माझा या गगनी,

घेतले पावसात मनसोक्त भिजून,

चिंब झाले तव मन भरेना अजून.


झिम्मड पावसात धरा घालू न्हाऊ,

ओढे,नद्यामध्ये जल लागले वाहू,

मित्रांसोबत केल्या कागदी होड्या,

पाण्यात सोडताना केल्या खूप खोड्या.


सदा आठवतो पाऊस बालपणीचा

हर्षाभराने नाचे मोर मनीचा,

उन्हाच्या झळ करते काहिली अंगाची,

घेई ओढ मन पावसाच्या आगमनाची.


पावसाची माझी अनोखी मैत्री,

एकमेका भेटण्याची असते खात्री,

भेटतो आम्ही आनंदाने दरवर्षी,

पहिल्या पावसाची भेट रोमहर्षी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama