STORYMIRROR

Sangita Pawar

Inspirational

4  

Sangita Pawar

Inspirational

पाऊस आणि कविता

पाऊस आणि कविता

1 min
247

येता पावसाळा ऋतु

खाऊ साखरेची गोळी

चिंब होऊनी गाऊया

पावसाच्या काव्य ओळी ||१||


मेघ गर्जे क्षणोक्षणी

मुक्त बरसल्या सरी

वीज सदा लखलखे

आली धावत भूवरी ||२||


इंद्रधनू लपंडाव

ऋतू पावसाळा फुले

कृष्णमेघ बरसता

मेघ आनंदाने डुले ||३||


गुंजारव भ्रमराचा

पाखरांचा घुमे नाद

शीळ घालतो पवन

निसर्गाशी घाली साद ||४||


तृप्त झाली आज पृथ्वी

जशी नवरी नटली

शालू हिरवा नेसून

धरा अंबरा भेटली ||५||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational