पाऊस आणि आठवणी
पाऊस आणि आठवणी
वृक्षांमधुनी सरी बरसता मातीने तो थेंब टिपता,
जमीनीवर तो दरवळ पसरणारा पहिला पाऊस
पानाफुलांत बरसणाऱ्या पाऊसधारा,
जमीनीवर पडल्यावर बनतात जणु अत्तराचा सडा
धरतीचा वेध घेत, रीमझीम पाऊस भिजवणारा,
शेत शिवार रानावनात हिरवळ पसरवणारा पाऊस बरसणारा
पाऊस कसा असतो ना? मनाचा ठाव घेणारा,
आतला असो किंवा बाहेरचा भरुन आला की कोसळणारा
पडुन गेल्यानंतर पानाफुलांचे सौंदर्य खुलवणारा,
फुललेली हिरवी पाती, थेंब थेंब मोती बनून चमकणारा
पाऊस झिजवणारा, पाऊस रीजवणारा
कोसळणारा पाऊस आणि गरमागरम चहा,
असतेच नाते,जसे असतात ऋणानुबंध पहा
मुसळधार पाऊस आणि चहाचा वाफाळता कप,
जणु एक समीकरण, निसर्गाचा आनंद लुटण्याचे साधेसुधे साधन
रीमझीम बरसणाऱ्या निवांत धारा,
हातात चहाचा कप थंडगार वारा
मैत्री आणि भवनांचा असाच उफाळता,
पाऊस,चहा आणि आठवणींचा ठेवा
चहाच्या गरम घोटासोबत दुःख ही घोटावे,
गोडवा कमी असला तरी जिवन जगावे
थेंबांसोबत उकळणारा, टपरीवर तो वाफाळता,
आठवणींचा चहा आणि पाऊस!!!
