पाऊस आला गावाला
पाऊस आला गावाला
छत्री विसरलो वस्तीगृहाला
पाऊस आला गावाला
वार्याने दिली साथ मेघांना
माहीत नव्हते कोणाला
ढग लागले पळू
आता मात्र पावसाचे वातावरण लागले कळू
रिमझिम झाली सुरू
पाणी लागले जमिनीमध्ये मुरू
शोधत होतो काणोसा
वृक्षानेच दिला आढोसा
पावसाने वाढवला वेग
लगबग चालू झाली झाकण्यासाठी चार्याची शीग
साठू लागली साऱ्यांमध्ये पाणी
वेडं मनच गुणगुणत होतं पावसाची गाणी
छत्री विसरलो वस्तीगृहाला
पाऊस आला गावाला
