STORYMIRROR

Sonali Butley-bansal

Abstract

3  

Sonali Butley-bansal

Abstract

पाउस आणी काही आठवणी

पाउस आणी काही आठवणी

1 min
175

गच्च भरून आलेले अन् स्तब्ध झालेले ढग

अन् क्षणांत कोसळणारा पाउस पाहून वाटलं होतं विचारावं,

चिंब भिजलेल्या रात्रीची मोरपंखी स्वप्नं कशी जागवली?


पावसात भिजताना सहजंच म्हणून कुणाची आठवण आली?

थरथरणाऱ्या थंडीची उब कशी निवळलीस?

धुक्याची चादर कशी लपेटलीस ?


नाहीच विचारता आलं सरळ सरळ,

तेव्हा स्वतःला गुरफटून घेतलं अस्ताव्यस्त पसरलेल्या कामात


पावसात चिंब भिजणं काय,

किंवा हिवाळ्यातील दुलईची ऊब काय,

किंवा उन्हाळ्यातील रात्री गच्चीवर चांदण्या मोजत बसताना

तेच प्रश्न पुनःपुन्हा पडत राहतात


ऋतू मागून ऋतू उलटत जातात

आठवणींच्या पसार्‍यात गोगलगाय होणं

अन् कोषात जाणं नीत्याचच झालय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract