पाठलाग
पाठलाग
वेध भविष्याचा घेण्यासाठी
पाठलाग स्वप्नांचा मी करत राहिले...
ना मागे वळूनी पाहिले
आभासी मनोरे मी रचत राहिले
कधी धडपडले-कधी कोलमडले
कधी धीराने उभी राहिले
मागे ओढण्यास मला
अनेकजण सरसावले
मदतीला नाही मात्र,
पाय खेचण्यास मागे
माझ्या उभे राहिले
माझे म्हणुनी......?
मी ज्यांना जवळ केले
त्यांनीच माझे स्वप्न भंग केले...
पण मी तरीही नाही हारले
पाठलाग भविष्याचा मी करत राहिले...
ना मागे वळूनी पाहिले
आहे मी खमकी...
आता शांत आहे
म्हणजे नाही मी मुकी
खेळ सारा हा नियतीचा
वेळ मात्र निभावूनी नेते
मुखवट्या मागील खरे चेहरे
प्रत्येकाला दाखवून देते
वेध भविष्याचा पटवून देते
