पाण्यासाठी पायपीट
पाण्यासाठी पायपीट
फिरतोस वन वन
कडकत्या उन्हाळ्यात,
कशी भागवेल तृष्णा
अश्रू दिसे नयनात..!!१!!
घोटभर पाण्यासाठी
जीव तळमळ होई,
करतोस पायपीट
शोधण्यास जलमाई..!!२!!
पाण्याविना तुझा
घसा पडला कोरडा,
पाणी नाही मुबलक
उगी करशी ओरडा..!!३!!
आज कळले महत्त्व
पाणी जपून वापर,
दुष्काळात पाण्यासाठी
कष्टी जीवन आवर..!!४!!
