STORYMIRROR

Pandit Warade

Romance

4  

Pandit Warade

Romance

पांग फेडलेस

पांग फेडलेस

1 min
465

का विसरलास रे बाळा

मी दाखवली तुज शाळा

चाललास धरून बोटाला

छुमछुम वाजवित वाळा।।१।।


जीव की प्राण तू अमुचा

जणू श्वासच उभयतांचा

नजरे आड जरासा होता

घास घशात अडकायाचा।।२।।


पाहिला ना दिवस रात

राबलो ऊन पावसात

पिकवून घामाचे मोती

भरविला घास तोंडात।।३।।


तुज नेत असता शाळेत

रंगविले स्वप्न या मनात

बाळ मोठ्ठा होऊन माझे

नाव काढेल या विश्वात।।४।।


बाळा तू खूप शिकलास

मात्र हातून निसटलास

पंखात भरले बळ तेव्हा

उंच नभात झेपावलास।।५।।


घेता हिरा निघावा गोटा

नशिबाचा असेल भाग

पाठवून मज वृद्धाश्रमी

फेडलेस चांगले पांग।।७।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance