पांडूरंग पांडूरंग
पांडूरंग पांडूरंग
पांडूरंग पांडूरंग
विठ्ठल विठ्ठल
एक नाम छंद हा
एकची गजर
ताल धरी पावले
टाळ नाद हाती
वारी वाट वारकरी
भजनी दंग
एक एक मुक्काम
गाव पड माग
किर्तन रंगी
विसावतो शांत
पांडूरंग पांडूरंग
विठ्ठल विठ्ठल
अश्र्व, रथ पुढ
माग पताका डोल
एक ध्यास मनी
कधी दिस पंढरी
विठू भेटी साठी
वारी चाले नाचे
ज्ञानोबा माऊली
तुकोबा संगे
पांडूरंग पांडूरंग
विठ्ठल विठ्ठल
भक्तिस उधाण
घुमते रिंगण
आनंदी आनंद
परमानंद
ओढ वाढे, धाव वाढे
धावा करी सारे
पांडूरंग पांडूरंग
विठ्ठल विठ्ठल
धावता गाता
संपली धाव
गाठली पंढरी
दिसला कळस
चंद्रभागा तीर
भक्त पुंडलीक
गोजीर रुपड
सावळा हरी
वाट पाहे आमची
कर ठेवूनिया कटी
पांडूरंग पांडूरंग
विठ्ठल विठ्ठल
एक नाम छंद हा
एकची गजर
