STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Abstract

3  

अमोल धों सुर्यवंशी

Abstract

पांढरा टिपका

पांढरा टिपका

1 min
354

रंगाची जत्रा भरली

वेगवेगळ्या रंगानी, हाजरी लावली


रंग मैफिलीत सारे रंगले

घोळून मिसळून, नटले सजले


काळा रंग रूसला

सार्‍यांनी त्याला दुखावला


आनंद त्याचा निर्जीव झाला

खोटे खोटे हासू लागला


पांढरा सारे पाहून त्याकडे धावला

रंगबिंदू त्याने छिडकला


काळयात टिपका पांढरा दिसला

पाहून सगळे दचकले


काळ्याने साऱ्यांना मागे सारले


एखाद्याच्या खुशी रंग मणभर नाही

तर कणभर द्यावे

त्याचे आयुष्यच रंगून जाईल, असे रंग बनावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract