पाखरू
पाखरू
माझ्या नजरेत बघ
चित्र तुझच दिसतं
एक लाजरं पाखरू
गोड गालात हसतं
रूप देखणं वेल्हाळ
मनी पडू लागे भूल
गोऱ्यापान गालावर
खुलू लागे प्रीतफूल
रोख तुझ्या नजरेचा
करे काळजाला घाव
माझ्या ओठांवर रुळे
प्रिये फक्त तुझे नाव
नको सोडू तू मोकळ्या
तुझ्या बटा काळ्याशार
दिलखुलास अदांनी
केले चाहत्यांना ठार

