पाखरे
पाखरे
घेता गगन भरारी
दिले पंखात बळ कोणी
नको घरटयास विसरू
दाणा चोचीत भरला कोणी ।।
कसे आभाळ कोसळले
माझ्या जुन्या घरटयावर
पिल्ले गेलीत दूरदेशी
घात होतो काळजावर ।।
पाखरे होतात पोरके
दगा झाडांनीही दिला
कालच्या दुष्काळात
आधार घरटयाचा गेला ।।
पाखरे येतील परतूनी
आस स्वप्नाची पहावी
तुटलेल्या झाडाखाली
आठवण तरी भेटावी ।।
