STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Romance

3  

shubham gawade Jadhav

Romance

पाहिले जेव्हा मी तुला...

पाहिले जेव्हा मी तुला...

1 min
303

    वाऱ्याने भुरभरणारे सोनेरी केस

    सारीत होतीस गालावरून बाजूला

    तेव्हा हरवून गेलो मी माझा मला

    होते पाहिले जेव्हा मी तुला

    

वेडा चंद्रही आभाळातला

    पाहुनी सौंदर्याला तुझ्या पाठीमागे लागला

    भाळुनी तुझ्या अशा सौंदर्याला वेड लागले मला

    होते पाहिले जेव्हा मी तुला

   

हसऱ्या चांदण्यांनीही शरदातल्या

   भुलून पाडला सडा तुझ्या स्वागताला

   गोड हसण्यावर तुझ्या प्रेम झालं मला

   होते पाहिले जेव्हा मी तुला

   

तुझ्या सौंदर्याच्या प्रत्येक अदेला

  आवडेल शब्दांमध्ये कैद करायला

   रेखाटायला शब्दांमध्ये शब्द अपुरे पडतात मला

   होते पाहिले जेव्हा मी तुला 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance