STORYMIRROR

Raosaheb Jadhav

Inspirational

5.0  

Raosaheb Jadhav

Inspirational

ओटीभरण झाले...

ओटीभरण झाले...

1 min
638


खुंट्यास बांधलेली, वासरे हंबरताना



खुंट्यास बांधलेली, वासरे हंबरताना

ती माय अक्षरांची, शक्ती होऊन आली

शब्दांस दिला जेव्हा, पान्हा जाणिवांचा

लेकरे सावित्रीची, पुष्ट होऊन गेली...


स्वत्व स्त्रीत्वाचे, सोबत जोतिबांच्या

लढत अज्ञानाशी, सोसत शेणगोळे

केले आकाश मुक्त, भरारण्या अक्षरा

अज्ञानी अहंतेचे, सारून दूर सोहळे...


माथ्यावर धारण केला, तिने ज्ञानसूर्य आणि

सोशिक ढग सारे, साक्षरे शरण केले

मस्तकास दिले मीही ओटीत सावित्रीच्या

मानवीय समतेचे, ओटीभरण झाले...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational