ऑनर किलिंग
ऑनर किलिंग
आज त्या वेड्या चंद्राला
चांदणी ती एक आवडली
तिला पाहून चंद्राच्या काळजात
प्रेमाची कट्यार घुसली
चांदणीलाही त्याच्याबद्दल
सारखे वाटायचे आकर्षण
तीही मनोमन खुश व्हायची
जेव्हा व्हायचे त्याचे मुखदर्शन
असेच काही दिवस गेले
नजरानजर आणि इशार्यांनी
तासनतास फोनवर बोलत
तर कधी चोरून भेटण्यानी
शेवटी दोघांनीही प्रेमाची कबूली दिली
सारे वाटू लागले नवे
दोघांच्याही हृदयात उडू लागले
प्रेमपाखरांचे ते थवे
सारे सुरळीत चालू होते
पण मध्येच झाला घात
प्रेम त्यांचे दुरावले गेले
कारण,मध्ये आली जात
कित्येक दिवस असेच गेले
गेले कित्येक क्षण
प्रेम त्यांचे दुरावले गेले पण
दुरावले नाही मन
विखुरलेल्या प्रत्येक क्षणांना
ते आठवत जगत होते
बुरसटलेल्या विचारांना दोष देत
आतल्या आत रडत होते
दोघांनीही ठरवलं शेवटी
आपण पळून जायचं
समाजापासून दूर जाऊन
दोघांनीही लग्न करायचं
झालं सारे नक्की
दोघेही गेले पळून
साताजन्माच्या बंधनात त्या
दोघे गेले अडकून
संसार सुरळीत चालू होता
पण इथेच शिंकली माशी
जातीपातीच्या नावाखाली
फुटली ऑनर किलिंगची सुपारी
जातीच्या त्या खेळीमध्ये
त्यांचाही मग घात झाला
ऑनर किलिंगच्या षड्यंत्रात
त्यांचाही मग जीव गेला
पुन्हा त्या बातम्यांमध्ये मग
अजून एकीची भर पडली
जातीपातीच्या विळख्यामध्ये
पुन्हा प्रेमाची हार झाली
चांदणीही ती निखळली गेली
चंद्रही तो झाकोळला गेला
जातीपातीच्या नावाखाली
प्रेमाच्या सूर्याचा अस्त झाला
