ऑनलाईन शिक्षक
ऑनलाईन शिक्षक
शिक्षकाची नवी ओळख
ऑनलाईन क्लास, यूट्यूब ,zoom, MST, आता सोयीचं वाटू लागलं.
बदलत्या काळनुरूप बदलायला हवं आता पटू लागलं,
रोजच्या धावपळीत काही निसटत नाही ना याचा विचार होऊ लागला.
डिजिटल क्लास,मल्टिपल intelligence ला आव्हान देणारे स्मार्टफोन्स हातात नाचू लागले.
हातातली काठी,शब्दातली कठोरता,डोळ्यांच्या भुवया ऑनलाईन स्क्रीन ला बघून लपून बसल्या.
नवोपक्रम आणि सर्जनशीतेला वाव मिळू लागला
माझ्यातला शिक्षक आनंदाने मुलांसोबत ऑनलाईन नाचू लागला.
पाठीवरच्या दप्तराच ओझ काही काळ उतरल, लिखापटीच्या,घोकंपट्टीच्या वाटा नको आता
जीवन कौशल्याच्या बळावर ओळख व्हावी नवी
जापुया सार पिढीच्या हिताचं, करूया दान आपल्या ऑनलाईन जगण्याचं.
गरज पडलीच तर मी आहे ऑनलाईन क्लास मध्ये, कोरोणाला सांगुया तुला ऑफ व्हावच लागेल.
घरात राहून जग फिरू ,प्रवासवर्णन नंतर लिहू
नवी ओळख या ऑनलाईन शिक्षकांची साऱ्या जगाला दाखवून देऊ.