वर्क फ्रॉम होम
वर्क फ्रॉम होम
लॉकडाऊनमध्ये चांगलीच तग धरू लागली,
कॉर्पोरेट क्षेत्रात नांदनारी कृती आता शिक्षणक्षेत्रातही बहरू लागली,
हा आभास म्हणावा की आव्हान ?
स्क्रीन टाईम कमी करा म्हणणारे शिक्षक आम्ही
ऑनलाईन क्लाससाठी तासनतास अॅप धुंडाळू लागलो.
आम्हीही आहोत तयार सर्व यंत्रणा सांभाळून फक्त
मानेचा कणा तेवढा मजबूत राहू द्या.
माणूसच नसेल तर कोण वापरणार ऑनलाईन?
व्यवहाराच्या बाजारात मिळतील काहो नवरस आयुष्याचे ऑनलाईन?
आम्हाला भरलेल्या वर्गात, निरागस डोळ्यात स्वप्न पाहायची सवय,
कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर नेटवर्क बसतो शोधत, आमची मुलं निरागस येस, नो म्हणत लॉकडाऊनमध्येही आहेत उत्साहात!
कोरोनापासून होऊ काहो मुक्त,वर्क फ्रॉम होमच्या
चौकटीतून बाहेर पडावं वाटतं पण पुन्हा मनाला समजावतो,चिमणी पाखरं किती शहाणी झालीत या चार भिंतीत जग जवळ करू लागलीत.
निदान थोडे दिवस ऑनलाईन राहू एकमेकांना डोळे भरून पाहू.