माझी धरणी माय
माझी धरणी माय
माय तू मी लेकरू तुझे
नटलेली माय माझी विविधतेने,
लागली का दृष्ट माझ्या पृथ्वीला?
सांगेल का कोणी काय गुन्हा होता तिचा.
लेकरं तिची वाट पाहतंय कोरोना मुक्त होण्याची
मायची काही लेकरं सोस्ताय घराबाहेर तिच्या घरातल्या लेकरांसाठी रात्र न दिवस पाहता देताय सुरक्षिततेचा.
माय माझी व्याकुळ आहे दवाखान्यातल्या डॉक्टरांची तळमळ पाहून कुणीतरी म्हणतंय थोडा धीर धर,थोडी कळ सोस,
माझ्या मायच वै भव परत येईल, उद्याचा सूर्य पुन्हा आशेची किरण पसरवेल नी कोरोनाला हरवेल !
माय बांधलेला मास्क काढून लेकरांना कुशीत घेऊन आनंदाने हसेल तिच्या कुशीतला बाळ पुन्हा नाचेल.