डाग समाज मनाचा
डाग समाज मनाचा
टीव्हीवरची रिन पावडरची जाहिरात बघितली नि मन हेलावून गेले
डाग चांगले असतात... मातीचे असो की रंगांचे असो,
छोट्या मुलांचे रंगलेले चेहरे, हात, पाय बघितले की हसू येतं आणि रागही येतो.
त्यांची निरागसता मात्र आपल्या नाकावरच्या रागाला औषध म्हणून कामात येते
नि चल हात पाय धुवून घे म्हणत रंगलेला चेहरा पुन्हा क्षणात चकाचक पूर्वीसारखा.
"मला पेंटींग कलायचं", असा हट्ट करत ब्रश आणि रंग कागदावर येताच
मी तेलं!, मला इतं पंतिंग कलायला! म्हणत भिंतीवर रंग आपोआप चढतात.
या चिमुकल्यांना मात्र कोरोना काय नि लॉकडाऊन काय कोणताच रंग कळत नाही
हे बघून सहज आपल्या मनातला भीतीचा रंग काही क्षणासाठी उतरून जातो
काही दिवसात कोरोनापासून सुरक्षित वातावरण निर्माण होईल नि
जुन्या जाहिरातीतील नवंपण पाहता येईल तोपर्यंत राहू या सेफ आपल्याच घरात...