आनंदी क्षण
आनंदी क्षण
एक एक क्षण हा सुखावणारा.
मनातल्या आठवणींनी भारलेला.
कधी पक्षी होऊनी मुक्त आकाशी झेपावणारा
माहेरच्या अंगणात विसवणारा,
शब्द शिखर हळुवार चढणारा,
मनोमनी दानातूनी उतराई होणारा,
समय कठीण सहज सोपा करणारा,
आशेच्या किरणांना शोधणारा,
मिलेळ उपाय लवकरी कोरोनामुक्त करणारा,
एक एक क्षण हा सुखावणारा.
सागरच्या लाटावरी स्वार होणारा,
पावसाच्या धारा त बेधुं
द भिजणारा,
मातीच्या सुगंधात मनसोक्त न्हाणारा,
चुलीवरच्या भाकरीची किंमत सांगणारा,
प्रितीच्या पाऊल खुणा कोरणारा,
एक एक क्षण हा सुखावणारा.
मातृत्वाची चाहूल देणारा,
नवमासाचे डोहाळे पुरवणारा,
प्रसूती वेदना सोसणारा,
काळजाच्या तुकड्याला डोळे भरून पाहणारा,
आई बाबा साद ऐकणारा,
एक एक क्षण हा सुखावणारा.
नव्या पालवीने बहरलेला,
पिकल्या पानाला हळुवार जपणारा,
नव्या जुण्याच्या पाऊलखुणा टिपणारा,
आनंदाचे वारे वाहणारा,
पुन्हा नव्याने जीवनाच्या अवस्था बदलणारा.
एकेक क्षण हा हातातून निसटून जाणारा,
दोन कराच्या ओंजळीत घट्ट मिटून ठेवलेला.