बालपण
बालपण
बालपण असे नित्य मजेचे
संस्काराचे, प्रेमळतेचे
हट्ट पुरवितीआई बाबा
काका मामा लाडक्यांचे.
भावंडांची प्रेमळ माया
भांडण मस्ती, नंतर शिक्षा
आंबट गोड चवीचे जीवन
सहज मिळावी समाज दिक्षा.
मातुलघरची दंगामस्ती
लग्नघराची धमाल मस्ती
मनात राही अवीट गोडी
किल्मिष सारे दूरच असती.
सखेसोबती निव्वळ सोबत
गप्पांसंगे चालत-बोलत
जीवन सारे आनंदाचे
प्रत्येकाच्या बालपणीचे.
