पसारा लॉकडाऊनमधला
पसारा लॉकडाऊनमधला
कागद, वह्या, पुस्तके सारेच पसारा वाटतं होतं
म्हटलं होऊ दे एकदाची परीक्षा, सारे आवरिण निवांत.
आवरला जाईल तो पसारा कसला, घरात खेळणाऱ्या मुलांचा प्रयोगिक कोपऱ्यातला एकांत.
तीच तऱ्हा किचनमधल्या सामानाची,
सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, तिसऱ्या पाहारी चुटुरपुटुर पुन्हा संध्याकाळच्या डाळ भाताचं कुकर.
टीव्ही, व्हाट्सअपवरही तोच पसारा, कोरोनाच्या बातम्यांचाच सारा कहर.
मास्क, सॅनिटायझर, साबण जीवाभावाचे झाले,
कोरोनाच्या पसाऱ्याला कुणीच पुरेनासे झाले.
घरातला पसारा आवरला जाईल.
बाहेरच्या पसाऱ्याला सांगा किती आवरतील डॉक्टर आणि पोलिस?
म्हणून सांगतो देवा आता तरी माणसांच्या या पसाऱ्याला सावरायला.
करतो प्रॉमिस तुम्हाला पुन्हा नाही हात लावणार या निसर्गाच्या पसाऱ्याला.