ओंजळ फुलांची
ओंजळ फुलांची
ओंजळ फुलांची भरली
अर्पू का मी देवा चरणी?
आले मी तुझ्या शरणी
देवा दे ना तुझी सावली?
मोठ्या कष्टाने मी मिळवले
जाण आहे का कुणाला?
मीच समजावते मनाला
आहे कां कोणी प्रेमळ आपले?
आपले आपण काम बघावे
त्या करता दुसऱ्यास त्रास का देणे?
स्वार्थी स्वतः कधी नसावे
परोपकार वृत्ती अंगी बाळगणे.
दान धर्म सदा करावा
मनी प्रेम भाव असावा.
