STORYMIRROR

Babu Disouza

Abstract

4  

Babu Disouza

Abstract

ओहोटी

ओहोटी

1 min
382

सरत आले तेल वातीचे ती धरेल काजळी

उदास खिन्न अवेळी कशी संध्याकाळ वादळी

सरत आले ऋतु बहराचे आता पानगळी

अंधार वाटे निस्तेज सूर्य दशा दिशा मावळी -१-


खूप जाहले सोहळे होते भोगले असोशीने

सरत आले आयुष्य आता बंद त्या चळवळी -२-


इरादा नव्हता जरी झाल्या वेदना नकळत

फूल होण्याच्या मर्म इंगिता जाणते कळी कळी-३-


अत्तरगंधी दाटल्या भेटी विना वचन बंधी

चुकार क्षणांची हळवी आठवण भळभळी -४-


प्रमादांचे स्वीकारी वार वीर कबुली अखेरी

अस्थिर कातर ओहोटी कां अंत समयी छळी-५-



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract