STORYMIRROR

Bhavnesh Pohan

Abstract Romance

3  

Bhavnesh Pohan

Abstract Romance

ओहोटी

ओहोटी

1 min
156

हे पाणी असं खूप 

आत आत गेल्यावर

कुणालातरी काही खुणा दिसल्या 

तेव्हाची गोष्ट.


वाळूवर कोरलेली त्या दोघांची नावं,

त्या शिंपल्यांसारखीच रंगीबेरंगी स्वप्नं,

लाटांची गाणी,

त्याने तिच्या ओठांवरून टिपलेला 

मावळतीच्या सूर्याचा 

गुलाबी केशरी रंग,

आणि 

विरुद्ध दिशेने जाणाऱ्या 

त्या दोघांच्या पावलांचे ठसे सुद्धा.


हे पाणी असं खूप 

आत आत गेल्यावर

कितीतरी जखमा उघड्या पडल्या होत्या 

तेव्हाची गोष्ट.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract