Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Bhavnesh Pohan

Others

4.8  

Bhavnesh Pohan

Others

डायरी

डायरी

1 min
771


कपाट आवरताना मला माझी एक जुनी डायरी सापडली

धुळीने माखलेली आणि अर्ध्याहुन अधिक फाटलेली

पहिल्याच पानावर माझं संपूर्ण नाव होत कोरलेलं

शाई संपत आली होती म्हणून दोन-तीनदा गिरवलेलं


सर्वांत आधी मी डायरीचं शेवटचं पान उघडलं

खोडलेलं "ते" एक नाव अलगदच कुरवाळलं

डोळ्यांतून तेव्हा एक थेंब पानावर ओघळला

शाईचा निळा रंग त्यानं उगाचच उधळला


भूतकाळाची पावलं पानागणिक मागे पडत होती

प्रत्येक कवितेला माझ्या तिच्याच नावाची सही होती

त्यावेळी तिला दिलेलं वचन मी पूर्ण केलं होत

शब्दांना माझ्या तिच्या अक्षरांनी सजवलं होत


वेचताना मग मोती असे फुटक्या क्षणांचे

उघडल्या जखमांतून जणु कवडसे मनाचे

तितक्यात निथळलं डायरीतुन एक पान

आठवणींच्या राखेतुन पुन्हा उजळलं एक रान


फाटलेल्या त्या पानाला चिकटलं होत एक फुल

पारिजातकाच्या दरवळाने पाडावी जशी भुल

फुल जपुन मी जेव्हा ठेवलं पुन्हा माझ्या डायरीत

बहरली नव्याने "ती" मला सुचलेल्या शायरीत


Rate this content
Log in