आहे म्हणून आहे
आहे म्हणून आहे
1 min
99
आहे म्हणून आहे
तिचं आणि त्याचं नातं
कुठल्याशा क्षणांनी जोडलेलं
तोडावं म्हटलं तुटत नाही
जुळायला कधी जुळलंच नाही
कैक आठवणींनी मुरलेलं
तसं आता नावापुरतं उरलेलं
तिचं आणि त्याचं नातं
एखाद्या जुन्या संहितेसारख
संवाद असले पाठ तरीही
आता बोलायची ताकद नाही
घ्यावा एखादा monologue तर
त्याला ऐकणारे हवे ते कान नाही
तिचं आणि त्याचं नातं
त्याच्याच एका कवितेच्या शेवटासारखं
नेमकं अर्ध्यावर सोडलेलं
क्षितिजभर पसरण्याआधीच
अगदी कातरवेळी मावळलं
असंच आहे म्हणून आहे
तिचं आणि त्याचं नातं
