ओढ
ओढ
काय मागतोस प्रीत, प्राण तूजला बहाल
जा करून क्लेश टाक , आज तू मला बहाल
बांधलाय सांगतेय, प्रेम साजरा महाल
हा महाल वा म्हणेन, तूज बंगला बहाल
चार चांदण्यात तूच, धुंद भोवताल हाल
ना करे तरी कुणीच, सोम चांगला बहाल
मोर काय नाचतोय, नेत्र थेंब हासतोय
आसवात मोरपंख, तूज शृंखला बहाल
रंगवून टाकशील, अंग चिंब चिंब तूच
आज फेकशील रंग, तूज कुंचला बहाल

