STORYMIRROR

Dinesh Kamble

Inspirational Others

3  

Dinesh Kamble

Inspirational Others

ओढ ...

ओढ ...

1 min
1.6K


ओढ लागली मनाला

चौदा एप्रिल सणाची

करू थाटात साजरी

सारे जयंती भीमाची


ओढ लागली मनाला

सखे भीम जयंतीची

याद आली बाई मला

आई, बाप ,माहेराची


धनी विनवणी तुम्हा

दोघे जाऊ या माहेरी

सारे मिळूनी या करू

भीम जयंती साजरी


सडा शिंपडूनी दारी

छान रेखाटू रांगोळी

लेऊ पांढरा ग शालू

आणि पांढरी ती चोळी


ओढ लागली गावाला

गावातल्या गं साऱ्यांला

निळा जयभीम देऊ

वाहणाऱ्या त्या वाऱ्याला


कधीकाळी भीमवाडी

सारी होती अंधारात

करे साजरी जयंती

आज मोठ्या दिमाखात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational