ओढ अनामिक अंतरी
ओढ अनामिक अंतरी


शब्द नभाच्या मनिचे
ओढ लाविते कुणाचे
अंतरी कुजबुज उगा
क्षण गाफीर अंतरीचे
रंग इंद्रधनुचे उधळत
प्रित बहरली रंगात
खुळ्या मेघापरी वेंधली
सरी आल्या त्या बरसत
मनात कातर काहुर
हुरहुर जागते का उगा
ओढ अनामिक अंतरी
ध्यास नित्य तुझा जीवा
ओठातूनी जी ओथंबली
प्रीती मनात ती साठली
अबोल नजरेची अदा
ठाव घेत मनी अंतरली
बेधूंद हवा गाफीर ही जराशी
तूफाना सांग तोल सांभाळू कशी
गुंतले मन ओढ ती अंतरली नशा
दंग जाहल्या बघ चारी दिशा