न्यूनगंड
न्यूनगंड
मनात जोपासलेले नकारात्मक विचार,
न्यूनगंड असावा,
न्यूनगंड न बाळगता,
सर्वोत्तम बनण्याचा विचार करावा
बाहेरची कोणतीच शक्ती नाही,
न्यूनगंड तुम्हाला संपवतो,
जन्मजात दुर्बल माणसं,
सर्वोत्तम बनल्याचे आपण पाहतो
आत्महत्या घेते न्यूनगंडातून जन्म,
आयुष्यात घडतो अनर्थ,
आयुष्याचा हा लज्जास्पद अपमान,
जीवन गमवू नका व्यर्थ
जे नाही त्यावर नका रडू,
जे आहे त्यावर आता आपण लढू,
मरत जगण्यात नाही अर्थ,
मरेपर्यंत जगण्यात आता धडपडू
