नयन
नयन
माझ्या या नयनाशी
सख्या तुझे रे नयन बोलायचे
तुझ्या नयनातील भाषा
माझे नयन रे जाणायचे........
अचानक तू नजरे समोर येता
नयन रे माझे सुखावती
क्षणात तू होता नजरे आड
नयन माझे रे पाणावती.....
नयन मिठताच माझे
तुझ्या स्वप्नात मी बुडते
तुझ्या आठवणीत सख्या
झोप माझे रे उडते......
माझ्या या नयनात रे
तुझ्या दुराव्याचाय वेदना
दिन-रात नयनात माझ्या
तुझीच रे प्रेम साधना.....
माझ्या रे नयनात सख्या
तुझ्या विरहाची बाधा
तुझ्या नयनांनी केला होता
माझ्या नयनाशी वादा......
नयन हॆ माझे वाट पाहती
तू येशील का रे पुन्हा
नयन हॆ माझे तुझ्या नयनाशी जुळले
हाच होता का रे माझा गुन्हा......

