नयन नजर.....
नयन नजर.....
सावळ्या त्या गालावरची,
तुझी खळी घेते मनाचा ठाव ....
नयन नजर पडताच क्षणी,
बसतात हृदयावर ह्या सहस्त्र घाव.....
देवाने घडवताना तुला ,
सौंदर्य हे खुल्या हाताने दिले....
सृष्टीतला सारा प्रेम रस मात्र,
तू तुझ्या सुंदर नयनांनी पिले.....
भेट आपली घडताना,
ओठ असतात कळीसमान मिटलेले...
निरोप तुझा घेताना,
नयनात अश्रू असतात ग दाटलेले....
उघड्या डोळ्यांनी दिसते तू,
अन मिटल्यावर ही तूचं दिसते ....
गाल तुझ्या डोळ्यांचे घेतात चुंबन,
जेंव्हा खळखळून तू हसते....
हे हृदय नेहमीच तुझं नाव घेते,
पाहुनी मन तुझं निर्मळ..
जीवनभर बनून राहायचंय मला,
तुझ्या सुंदर डोळ्यातील काजळ.....

