न्यायदान
न्यायदान
कारभार चाले हा असा न्यायदानाचा,
विश्वास हा उडू लागला या जनतेचा
भगवत गीतेस करुनी स्पर्श हातांनी ,
शपथ घेती सांगेन सत्य ती कहाणी.
तरी येथे ना बोलती सत्य कोणी,
जणू चाले येथे असत्याची शिकवणी
सुटले जरी नव्व्यानव दोषी,
ना गुंतावा एकही निर्दोषी
असे तत्त्व हे न्यायदानाचे,
अन तेची दोषींच्या फायद्याचे
ज्यांचे जळाले ते होरपळून मेले,
अन ज्यांचे राहीले ते गुदमरून गेले
न्यायासाठी हक्काच्या यांनी किती झगडावे,
सत्याच्या विजयासाठी मस्तक का फोडावे?
