नवयात्रिक
नवयात्रिक
21 वे शतक
नवयुगाचा नवयात्रिक मी
चालतो नव शतकाकडे
मानवतेचा मुर्दा पडता
वळण माझे हे वाकडे
प्रगतीच्या या वाटेवर मी
गहाण मेंदू परदेशाकडे
फॅशनच्या दुनियेत रमता
शरीर माझे हे वाकडे
भुकेची आग पडता
अधांतरी मी अधांतरी
वासनेचा आगडोंब उसळता
रक्तपात नि शील पडे
नवशतकाचा नवतरुण मी
बाता मारतो प्रगतीच्या
प्रश्नाचे उत्तर नाही
नवशतकातील जगण्याचा
