नव्या युगाच्या उंबरठ्यावर
नव्या युगाच्या उंबरठ्यावर
नव्या युगाच्या उंबरठ्यावर
परिवर्तनाची आवर्तने
दूर गेलीत माणसे
दूर झाली ती मने
अज्ञाताच्या भीतीने
जवळ कोणी जाईना
पाठ फिरवी जगाकडे
नजरेला नजर देईना
भीतीने ग्रासले जीवाला
माणूस तडफडतोय रस्त्यावर
हात कोणी लाविऩा
मृत्यूच्या उंबरठ्यावर
कधीतरी होईलच ना
अंत या साऱ्या भीतीचा
निवळेल आकाश सारे
उगवेल सूर्य आशेचा