नव्या आशेची नवी पहाट.......
नव्या आशेची नवी पहाट.......
नव्या आशेची नवी पहाट
घेऊनी आली सुख-स्वप्न नवे
आनंदाचे उधाण भरले
सोबतीला आकाक्षांचे थवे
पहाटवारा दवबिंदूंनी सजली
अवनी किलबिलाटा सवे
थुईथुई नाच मयुराचा लोभस
दृष्टीस अजून काय हवे
केशरसडा शिंपडला आकाशी
सुखसौख्याचे उधळले रंग नवे
उघड पंखांना मुक्त होऊ दे
उद्याची स्वप्न कवेत घे सवे
चैतन्याचे शब्द उधळूनी
गीत सुमधूर स्फूर्ती सह गावे
अपुल्या स्वप्नांच्या झुल्यावर
यश-किर्ती सह खूप झुलावे
सारूनिया दूर दुःस्वप्नांना
दुःखाचे ना क्षण मोजावे
हसऱ्या निरागस क्षणांना
हृदयी अपुल्या सदा जोपासावे