STORYMIRROR

Rutuja kulkarni

Abstract Inspirational

2  

Rutuja kulkarni

Abstract Inspirational

नववर्ष

नववर्ष

1 min
97

गतवर्षी च्या आठवणींचा मोह,

आता सोडायला हवा

नव वर्षाच्या आरंभी आता,

नव्याने आयुष्याचा आरंभ करायला हवा


आयुष्याच्या नव्या पानांवर,

नवनव्या कल्पकतेचा मनोरा रेखाटायला हवा

नव्या रंगांचा कुंचला फिरवून,

आनंदाचा इंद्रधनू फुलवायला हवा


यश शिखरापर्यंत पोहचण्यासाठी,

स्वप्नांच्या प्रवासाचा वेग हा वाढवायला हवा

नकारात्मक विचारांचा तो मळभ, 

मनावरून दूर काढायला हवा


नव वर्षाच्या आरंभी आता, 

नव्याने आरंभ करायला हवा

आयुष्याला ही हेवा वाटेल, 

फक्त प्रत्येक क्षण मनाजोगे जगता यायला हवा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract