नवरा नावाचं विद्यापीठ
नवरा नावाचं विद्यापीठ
नवरा नावाच एक
महाविद्यापिठ असतं
काही अंशी कठोर अन्
नियमांचं काटेकोर असतं
संसाररुपी रथावर तो
नेहमीच स्वार असतो
जबाबदारी पेलताना स्वतःला
सक्षम बनवत असतो
जीवनातले सारे संघर्ष
हातोटीने सोडवत असतो
निर्णयाच्या परीक्षेत तो
खरा उतरत असतो
नवरा नावाचं हे विद्यापीठ
मनाने हळवंही असतं
कधीतरी कुशीत शिरून
रडतानाही दिसतं
तो रोज तोंड देत असतो
वेगवेगळ्या आव्हानांना
उत्साहाने साथ द्या तुम्ही
त्याच्या भावनांना

