सारा आसमंत कवेत माझ्या*
सारा आसमंत कवेत माझ्या*
सारा आसमंत कवेत माझ्या,
घेऊन मी आनंदाने जगेन.
प्रेमाच्या भवनाना मनात ठेऊन,
मी इतरांशी प्रेमाने वागेन.
प्रितीच्या फुलाला नाव देऊन,
तुझे मी हर्षाने जगेन.
तुझ्या मिठीत मला घेशील,
तुझ्या प्रीतीत मी बहरील.
तुझ्या माझ्या प्रीतीचा जणू,
वाहत आहे प्रेमाचा गार वारा.
तुझ्या मिठीत सखे,
वाटतो मला कवेत आसमंत सारा.
आठवतात मला ते क्षण,
पाहशील का तू माझे मन.
नको मला किती ही धन
रोजच घडो आपल्या प्रेमाचे सण.

