STORYMIRROR

Yogesh Harne

Inspirational

3  

Yogesh Harne

Inspirational

आई

आई

1 min
232

भावंडांचा सांभाळ करण्यासाठी,

आई तू शाळा सोडलीस,

आईला मदत करण्यासाठी,तू शेतात राबलीस.

वडिलांनी कमी वयातच चढवलं तुला बोहल्यावर 


आली सासरी दारतलं माप ओलांडून,

सूनबाई पाणी आण,सून बाई चहा दे,

नंदेची फरमाईश, दिराचा आदेश,

पूर्ण करता - करता, त्यांचीच झालीस.


तू सासू सासऱ्यांसाठी नि नंदा - दिरासाठी जगली

स्वतः साठी जगणं,तू विसरूनच गेलीस...


आला तुझ्या आयुष्यात असा एक क्षण 

रामनवमीला आला घरात राम नि 

लक्ष्मी - सरस्वती सारख्या मुली दोन 

स्वतः अशिक्षित असूनही 

तू शाळेत आम्हाला पाठवलंस 


परिस्थितीशी हिमतीने लढयाला तूच शिकवलंस.

जगलीस तू आमच्यासाठी,पण केव्हा जगणार आई तू स्वतः साठी


चाळिशीच्या वयात 

आता शरीर तुझ देत नाही साथ 

आमच्या काळजीने लागते तुला धाप

सर्वांसाठी जगता - जगता 


तू स्वतः साठी जगणं विसरून गेलीस,

तू स्वतः साठी जगणं विसरून गेलीस...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational