निरोप तुजला देताना
निरोप तुजला देताना
1 min
240
लेक चालली सासरी
किती करु तिचे लाड
माझ्या काळजाचा तुकडा
आज होईल नजरेआड
लेक चालली दूरदेशी
किती न्याहाळून पाहू
हाती कुंकवाचा करंडा
वाटी मैनाला गं लावू
किती वाट गं मी पाहू
आता कधी येशील परत?
तुझ्या भेटीची गं आस
मनात राहील तेवत
माझी लेक गं बाई जशी
जशी पाडस हरिणी
भरकन उडून गेली
जणू घरट्यातून चिमणी
आज झालीस परकी
तुझं केलं कन्यादान
निरोप तुजला देताना
आला कंठाशी गं प्राण
अशी कशी रे ही रीत
नाव तिचं रे पाठवणी
माय-लेकीच्या विरहाची
ही करुण कहाणी
