STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Romance Others

3  

Trupti Thorat- Kalse

Romance Others

मनाची पाने चाळताना.....

मनाची पाने चाळताना.....

1 min
225

मनाची पाने चाळताना

जुन्या जखमा सांधताना

भावनांचा पूर येतो अन

नयनांमधूनी ओसंडून वाहतो.

तुझ्या आठवणीच्या गावी

मनाचा मोर पिसारा फुलवून

अलगद नाचून ही येतो.

तू दिलेल्या फुलांचा सुगंध

अजूनही....

खरचं डायरीत पाने 

चाळताना दरवळत असतो...

मनाची पाने चाळताना

तू कसा असशील फक्त

हाच विचार छळत असतो.

सतत हाच पाठपुरावा 

मन माझे करत असते.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance