मागे वळुनी पाहता
मागे वळुनी पाहता
क्षण सुखाचा आज ओंजळीत मावेना
भाव दुखाचा हा काही केल्या सरेना
वळणावरती उभी एकटी ती सावली
खुणावते का ही कोवळी उन्हे मृगजळी
मागे सरल्या एकाकी त्या पाऊलखुणा
संगे चालती या कवितेच्या भाव ओळी
परतुनी येता पाऊस तो ऋतू सौख्याचा
आठवणीचे दव सुखाचे ओंजळीत साठता
शब्दास सांगितले भावली छबी ती मनातले
मांडले काव्यात लेखणीने ते क्षण आठवातले
मागे वळुनी पाहता हासरे नभातील चंद्र तारे
भेटले जग परतुनी क्षण ते जगले हे नभ सारे

