गुलाबी थंडी
गुलाबी थंडी
गुलाबी या थंडीमध्ये
भरलाय असा गारवा
बेधुंद होऊन रानवारा
गुणगुणतो राग मारवा
हिरव्या शालूची लपेट
वसुंधरा दवबिंदू झेली
सख्याच्या मिठीत रात्र
खूमार मस्तीतच गेली
धूक्याचे दाट हे लिंपण
तोडुनी अवतरला रवी
सागरीतटावर बसूनीच
काव्यविश्वे रमला कवी
सृष्टीचे अबोल हे नाते
रम्य मनोहारी नजारा
नाहलीय चिंब वसुंधरा
सोडी उन्मादी पसारा

