चंद्र आहे साक्षीला...
चंद्र आहे साक्षीला...
चंद्र आहे साक्षीला.....
तुझ्या माझ्या प्रितीला.
रातरणीच्या मंद
दरवळणाऱ्या सुगंधला.
आपल्यात कधी-कधी
झालेल्या रुसव्या अबोल्याला.
चंद्र आहे साक्षीला जेथे धरती आणि
गगन एक होतं त्या क्षितिजाला.
चंद्र आहे साक्षीला
पौर्णिमेच्या रातीला
समुद्राच्या ओहोटी-भरतीला,
त्याच्या उसळलेल्या प्रत्येक लाटेला.
चंद्र आहे साक्षीला......
माझ्या डोळ्यातून
वाहणाऱ्या प्रत्येक वेदनेला.
माझ्या मीच सांधलेल्या जखमांना.

