तो मोगरा नसेना
तो मोगरा नसेना
सारून केस थोडे, जी ती कवेत आली.
घाईत कर्णफूली, हाती अचेत आली.
लाजायची अशी गं , तूझी उनाड खोडी.
बोटात ओढणीला, पेचे तु देत आली.
रातीत आज गाणे, आले भिजून ओठी,
श्रुंगार ह्या रसाची, जादू हवेत आली.
श्वाशांमधेच राही, तूझा सुगंध राणी.
तो मोगरा असावा, धुंदी नशेत आली.
काया-सुगंध बोले चिठठी विना तु येना.
तो मोगरा नसेना, वेलीच श्वेत आली.

