नवल
नवल
रक्षती हिरवी पर्णे ती नवकलिकांना
दृष्टावू नये कोणी नवतीच्या सांभारांना
गंध उधळीत फुले फुलली उपवनी
आठवण कुणाची बरे रेंगाळते मनी
मनभावन रंग धारिले ते आकर्षाया
आराध्या चरणी अर्पाया वा शिरी वर्षाया
परागकण मधुररसपना भ्रमर
गुंजन करिती सभोवती अष्टौप्रहर
वायासवे स्वगत मंद गुणगुणे कुणी
समर्पण करा जीवना अंती त्यांचा ऋणी
